" जेनी मलेशियामधील तिच्या मानववंशशास्त्र-विषयक संशोधन प्रकल्पाला आर्थिक बळ देता यावे म्हणून अनिच्छेने तिची हाउसबोट विकण्याचा निर्णय घेते. सुरुवातीला कुणी संभाव्य गिऱ्हाईक मिळेलसं दिसत नसते पण एके दिवशी ती बाहेर उभी राहून नावेला रंग देत असताना आकर्षक कपड्यांतील एक माणूस नावेची पाहणी करण्यासाठी येतो. पण फक्त नावच नाही, आणखीही काही त्याच्या पसंतीस पडले आहे... त्याला तिच्यात मनापासून रस असावा असं वाटतंय आणि जेनीच्या लवकरच लक्षात येतं की तिला त्याच्या पैशांपेक्षा त्याच्या शरीरात अधिक रस आहे... ही लघुकथा स्विडिश चित्रपट निर्माती एरिका लस्ट यांच्या सहयोगाने प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."